Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारने रेशन दुकानांसाठी केला 'हा' नवा नियम

सरकारने रेशन दुकानांसाठी केला ‘हा’ नवा नियम

नवी दिल्ली | New Delhi

प्रत्येक गरीब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत सर्वत्र स्वस्त धान्याची सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा रेशन दुकानदारांनी (Ration Shopkeeper) फसवणूक (Fraud) केल्याने गरजूंपर्यंत ते अन्नधान्य पोहोचत नाही. त्यामुळे आता सरकारने प्रत्येक रेशन दुकानदाराला त्याच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (Electronic Point of Sale) लावणे अनिवार्य केले आहे…

- Advertisement -

प्रत्येक व्यक्तीला रेशनवर धान्य हे त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार मिळते. यात अनेक व्यक्ती उत्पन्नात वाढ (Increase income) झाल्यावर देखील काळ्या बाजाराने रेशनच्या दुकानातून धान्य विकत घेतात. त्यामुळे गरजूंच्या वाट्याला कमी धान्य उरते. यामुळे शासनाने इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल इलेक्ट्रॉनिक तराजूला जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,नव्या नियमानुसार एनएफएसएमार्फत ८० कोटी व्यक्तींना हे धान्य पुरवले जात आहे. यात प्रत्येकास दर महिन्याला ५ किलो गहू आणि तांदूळ फक्त २ ते ३ रुपये दराने दिले जातील. तसेच नवीन नियमात रेशन विक्रेत्यांनी नागरिकांचे हक्काचे धान्य (Grain) फसवणूक करून घेऊ नये, यासाठी त्यांना देखील आकर्षक मानधन दिले जात आहे. पंरतु, आता शासनाने कामात पारदर्शकता यावी यासाठी कलम १२ नुसार रेशनच्या वजनात बदल केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या