लालपरी ठप्प : संघटना व सरकारच्या आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

लालपरी ठप्प : संघटना व सरकारच्या आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई

उच्च न्यायालयाचा (High Court) आदेश झुगारून संप सुरूच ठेवणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच एसटी महामंडळ प्रशासनाने (MSRTC Administration) आता संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspended) केले. या पार्श्वभूमीवर एसटी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता ही बैठक मुंबई सेंट्रल एसटी डेपो इथे होणार आहे. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी तोडगा निघणार की संप सुरु राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

एसटीच्या संपासंदर्भात मोठी बातमी. संपावर गेलेले 376 एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. ( ST Employees strike) एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी संयुक्त कृती समितीची आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

एसटी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता ही बैठक मुंबई सेंट्रल एसटी डेपो इथे होणार आहे. एकीकडे सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यावर आता आजच्या बैठकीला महत्त्व आहे. आजच्या बैठकीत तरी एसटी संपावर तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे.

राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

राज्यभरातील 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील अहेरी,

ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील 14 कर्मचारी, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील 14 कर्मचारी, लातूर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर आगारातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर आगारातील 58 कर्मचारी,

भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील 30 कर्मचारी, सोलापूर विभागातील अक्कलकोट आगारामधील 2 कर्मचारी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-1 आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, नागपूर विभागामधील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमाननगर आगारातील 18 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर,आटपाडी आगारातील 58 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com