शाळांमध्ये दुपारचे जेवण मोफत मिळणार

शाळांमध्ये दुपारचे जेवण मोफत मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक (Union Cabinet)पार पडली. या बैठकीत देशातील सरकारी शाळांमध्ये दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळांमध्ये दुपारचे जेवण मोफत मिळणार
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे आणि शिक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण (PM POSHAN)योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे आणि १.३१ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यांच्या सरकारांच्या मदतीनं या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्योग क्षेत्रासाठी मॅन्युफॅक्चरिंगबाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात आत्मनिर्भर भारत योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात २१ सप्टेंबरपर्यंत देशात १८५ बिलियन डॉलरची निर्यात झाली असून गेल्या सहा महिन्यातील हा सर्वोत्तम आकडा आहे.

Related Stories

No stories found.