
पुणे | Pune
येथील गुगलचे ऑफिस (Google office) बॉम्बने (bomb threat) उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील (Mumbai) गुगलच्या (google) कार्यालयात कोरेगाव पार्क येथे बॉम्ब असल्याचा फोन आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू मिळाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी एकाला हैद्राबाद येथून अटक केली आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील पुनावाला इमारतीमध्ये शेवटच्या मजल्यावर गुगलचे ऑफिस आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे ऑफिस सुरु करण्यात आले होते. मुंबईतील गुगलच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करुन पुण्यातील गुगलच्या ऑफिसखाली बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत मुंबईच्या गुगल ऑफिसने पुणे पोलिसांना माहिती दिली. यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ गुगलच्या इमारतीमध्ये जाऊन तपास सुरु केला. मात्र तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी तपास करत हैद्राबाद येथून एकाला अटक केली आहे.