International Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी गुगलचं खास डूडल

International Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी गुगलचं खास डूडल

दिल्ली | Delhi

आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.

जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगलने (Google) आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खास गूगल डूडल (Google Doodle) बनवले आहे.

आज गूगलच्या होमपेजवर स्पेशल अ‍ॅनिमेटेड डूडल झळकत आहे. ज्यामध्ये समाजाच्या विविध स्तरावर काम करणार्‍या महिलांचं रूप पहायला मिळत आहे. यात महिला एक होम मेकर ते वैज्ञानिक असा तिची अनेक रूपं दाखवण्यात आली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com