गुगल करणार नोकरकपात

सीईओ पिचाई यांची घोषणा
गुगल करणार नोकरकपात

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

गुगलची ( Google )मातृसंस्था असणारी अल्फाबेट( Alphabet) ही कंपनी सुमारे 12 हजार जणांना नोकरीवरून काढणार आहे. संबंधित कंपनीने जगभरातील एकूण कर्मचार्‍यांपैकी सहा टक्के नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोकरकपातीचा जागतिक स्तरावर आणि संपूर्ण कंपनीतील कर्मचार्‍यांवर परिणाम होईल. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई ( Google CEO Sundar Pichai)यांनी शुक्रवारी एका इमेलद्वारे नोकरकपातीची घोषणा केली. या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहे, असेही पिचाई यांनी इमेलमध्ये लिहिले.

मागील काहीकाळात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या मेटा, ट्विटर आणि अ‍ॅमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. ढासळती जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गुगलनेही नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे गुगल ही सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे.

या कंपनीत लाखो लोक काम करतात. ही कंपनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात टाळत आहे. परंतु डिजिटल जाहिरातींमध्ये कंपनीला मंदीचा सामना करावा लागत आहे. परिणामी ही नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिचाई यांनी इमेलमध्ये लिहिले, आमचे लक्ष्य अधिक स्पष्ट करण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. कंपनीचे भांडवल आणि कंपनीतील वर्कफोर्स योग्य दिशेने वळवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com