Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकोरोनाचे संकट : गुगल, मायक्रोसॉफ्टने भारतासाठी केली ही घोषणा

कोरोनाचे संकट : गुगल, मायक्रोसॉफ्टने भारतासाठी केली ही घोषणा

नवी दिल्ली

कोरोना दुसऱ्या लाटेच्या संकटात सापडलेल्या भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारतासमोर आलेल्या या संकटात जगातील दोन बड्या कंपन्यांनी मदत देऊ केली आहे. या दोन्ही कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारत जगाच्या मदतीला धावून गेला. परंतु दुसऱ्या लाटेत भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. यामुळे जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. जगातील दोन दिग्गज कंपन्या मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने भारताला मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी यासंदर्भात टि्वट केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारतातील कोरोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले आहे. भारतात दिवसाला लाखो रुग्ण सापडू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार अाहे.

गुगलची १३५ कोटींची घोषणा

अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई यांनी देखील आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत, कोरोनाच्या प्रसाराची आणि रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या