Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानववर्षात किसान रेल्वेकडून खुशखबर

नववर्षात किसान रेल्वेकडून खुशखबर

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

किसान पार्सल ट्रेनने नवीन वर्षात खूशखबर दिली आहे. भारताची पहिली किसान रेल्वे 7 ऑगस्टला 20 रोजी देवळाली कॅम्प ते दानापूर दरम्यान सुरु झाली. भुसावळ विभागात किसान रेलने आतापर्यंत 57 ट्रिपव्दारे 8 हजार 288 टन कृषी मालाची वाहतूक केली. त्याव्दारे 2 कोटी 87 रुपये महसूल मिळाला.

- Advertisement -

मीरजजवळील सांगोला येथून किसान पार्सल ट्रेनची देशातील शंभरावी ट्रीप नुकतीच रवाना झाली. डाळिंब, मासे, भाजीपाल्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून द्राक्षे आणि पल बोरही या गाडीतून पन्नास टक्के अनुदानातून रवाना होऊ लागले आहेत. किसान ट्रेनचा विस्तार करण्यात आला आहे. त्यानुसार देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी 31 मार्च 21 पर्यंत चालवण्यात येणार आहे.

नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुर्‍हाणपूर, खंडवा येथे तीला थांबा आहे. सांगोला-मनमाड किसान लिंक पार्सलगाडी सुरु झाली असून ती 31मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. सांगोला शालिमार किसान लिंक पार्सल गाडी 31मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. मनमाड, भुसावळ येथे ती थांबेल. मुंबई-शालिमार साधी पार्सल गाडी अप-डाऊन 31 मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. तीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबा आहे. पोरबंदर-शालिमार पार्सल गाडी 1 एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार असून तीला भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबा आहे.

देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी आठवड्यातून तीन दिवस धावू लागली आहे. डाळिंब, कॅप्सिकम, हिरव्या मिरच्या, आले, लिंबू, मासे, मिश्र भाज्या यासारख्या मालाची वाहतूक केली जात आहे. छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने तसेच कमी खर्च, सुरक्षित वाहतूक, त्वरित पुरवठा यामुळे शेतकर्‍यांचे जीवनमान समृद्ध होत असून त्यांचे जीवनमान बदलले आहे.

या गाडीने छोट्या रेल्वे स्थानकांना शेती उत्पादनांच्या मोठ्या लोडिंग हबमध्ये बदलले आहेत. शेतकर्‍यांनी माल पॅक करून जवळच्या रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये आणावा. सोबत आधार कार्डची झेरॉक्स ठेवावी. शेतकरी, कार्गो एग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या