Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलांसाठी गुड न्यूज! आजपासून ST प्रवासात ५० टक्के सवलत

महिलांसाठी गुड न्यूज! आजपासून ST प्रवासात ५० टक्के सवलत

मुंबई | Mumbai

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली होती.

- Advertisement -

त्या अनुषंगाने आज १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.

हद्दच झाली राव!! गोडाऊन फोडून ४५ खाद्य तेलाच्या डब्ब्यांसह कुत्र्याच्या पिल्लाचीही चोरी

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती.

तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.

श्रीगोंद्यातील अरणगाव दुमाला येथे सशस्त्र दरोडा, हल्ल्यात एकाचा मृत्यू

५० टक्के सवलत मिळाल्याने ग्रामीण भागातील गरीब महिलांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनीनाही याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे महिलांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळाला आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवास सुरू करण्यात आला आहे. या मोफत प्रवास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा नागरिकांना लाभ होत आहे.

बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमुकल्याचा अखेर मृत्यू

दरम्यान अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महिलांसाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात मांडली आहे. त्यात पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार असून जन्मानंतर मुलीला ५००० रुपये, पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये, अकरावीत ८००० रुपये, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५००० रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या