महिला पोलिसांसाठी खुशखबर! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

महिला पोलिसांसाठी खुशखबर! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस (Police) दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ ८ तासांपर्यंत करण्यात आली आहे….

त्यामुळे संसार आणि नोकरी सांभाळताना महिलांची (Women Police) होणारी कसरत आता कमी होणार असून, त्यामुळे महिलांना कुटुंबीयांसाठीही पुरेसा वेळ देता येणार आहे.

या निर्णयानुसार नाशिक शहर पोलीस दलातील ४५१ हून अधिक महिलांना दिलासा मिळणार आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्यांच्या कामकाजाची वेळ ८ तासांपर्यंत केली आहे.

१२ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम केले जात असल्याने कौटुंबिक व नोकरीची जबाबदारी सांभाळताना महिला पोलिसांची कसरत होत आहे. ही बाव ओळखून सुरुवातीस नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्यूटी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांनी पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत यांनी पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.

पुणे ग्रामीण आणि अमरावती पोलीस आयुक्तालयाने महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती. त्यानंतर शासनाने राज्यात हाच उपक्रम राबवण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यामुळे महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १२-१२ तास सेवा बजवावी लागत असल्याने महिलांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून मानसिक, शारीरिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

Related Stories

No stories found.