
मुंबई | Mumbai
नवीन वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक आनंदाची बातमी मिळाली आहे. राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याच्या शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भर पडणार आहे.
राज्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार (GR) केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे.
केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन (Salary) त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) सुधारित वेतन मिळणार आहे.
राज्य शासनाने (State Govt) यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या सेवेतील १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने वेतन श्रेणीतील तफावतीदूर करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहे. त्यामुळे आता १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान केंद्र सरकारने (Central Govt) २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग लागू करण्यात येणार होता. मात्र त्यात काही त्रुटी होत्या. आता नव्या शासन निर्णयात या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी आता अधिकच आनंदाचे ठरणार आहे.