
नवी दिल्ली | New Delhi
देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हजारो तरुणांचे आयुष्य उजळणार आहे. रोजगार मेळ्याअंतर्गत, सरकारी विभाग (Govt Department) आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 13 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दृकश्राव्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रे (Appointment letters) वितरित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आहेत.
देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त, भारत सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल तथा तिकीट लिपिक, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, वरिष्ठ ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहायक प्राध्यापक (Assistant Professor), शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षाधीन अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ - एमटीएस, अशा विविध स्थानांवर /पदांवर रुजू होतील.
नवनियुक्त उमेदवारांना, कर्मयोगी प्रारंभ मोड्युल (module) मधून प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल. कर्मयोगी प्रारंभ मोड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागांतील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण अभ्य़ासक्रम आहे.