नाशिकरोड मालधक्क्यामुळे उत्तर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस

नाशिकरोड मालधक्क्यामुळे उत्तर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

नाशिकरोडच्या (Nashik Road) रेल्वे मालधक्का (Railway freight) हजारो कुटुंबाचा आधारवड झाला आहेच परंतु, पर्यावरण (environment), कृषी (Agriculture), अर्थ, समाजकारण (Sociology), उद्योग व्यवसाय, देशसेवा या मध्येही महत्वाची भूमिका बजावत आहे.

वाशांप्रमाणेच मालवाहतूकीसाठी रेल्वेने स्वतंत्र लाईन टाकण्याचे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडार योजनेतंर्गत (Dedicated Freight Corridor Scheme) देशभरात सुरु केले आहे. जळगावपर्यंत (jalgaon) ते झाले आहे. भुसावळ-नांदगाव (Bhusawal-Nandgaon) दरम्यान सुरु आहे. नाशिकरोडला स्वतंत्र लाईन झाल्यानंतर या मालधक्क्याला व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राला (North Maharashtra) सोन्याचे दिवस येणार आहे. येथील मालधक्क्यामुळे हजारोंचं गावच वसले असून त्याची अर्थ, समाजव्यवस्था, येथील उद्योग-व्यवसाय मालधक्क्यामुळे आलबेल आहे. येथे पाचशे माथाडी कामगार असून त्यांना दिवसाला 400 ते 800 रुपये रोजगार मिळतो.

रेल्वेने आलेला माल ट्रकमध्ये भरल्यानंतर तो नियोजित स्थळी पोहचविण्यासाठी असंख्य ट्रकचालक, किन्नर, हमाल लागतात. याव्दारे तीनशे जणांना रोजगार (Employment) मिळाला आहे. येथे तीन कार्टिंग एजंट (Karting agent) असून त्यांच्याकडे मिळून 80 कर्मचारी, 35 सफाई कामगार आहेत. येथे दहा सुरक्षा रक्षक आहेत. मालधक्क्यावव पंचक्रोशीतील वसाहत, शाळा, छोटे व्यावसायिक यांची हजारो कुटुंब अवलंबून आहेत. ही कुंटूबे नगरसेवक, आमदारांच्या विजयात मोलाचा वाटा ठरतात. मालधक्क्यावर येथील अर्थ, राजकारण व समाजकारण चालते. या मालधक्क्यामुळे जिल्ह्यातील इतर मालधक्क्यांना आधार मिळत आहे.

रेल्वेला फायदा

मालधक्क्यावर महिन्याला एकूण 50 ते 55 मालगाड्या येतात. गहू, तांदूळ, सिमेंट, खत हा माल सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामात उतरवला जातो. त्याची क्षमता साडेसहा हजार टन आहे. रेल्वे मालधक्का व जागा वापरोपोटी वेअर हाऊसकडून रेल्वेला महिना सुमारे 50 लाख भाडे मिळते. याशिवाय रेल्वेचे साडेचार हजार टन क्षमतेचे स्वतःचे गोडाऊन आहे. महिंद्राची वाहने मालधक्क्याहून रवाना केल्यामुळे रेल्वेला महिना तीन कोटी महसूल मिळतो. तो 45 कोटी करण्याचे लक्ष्य आहे. आता टाटाच्या गाड्या येऊ लागल्या आहेत.

मालधक्क्यावर येणार्‍या मालगाड्यांची संख्या महिना पन्नास वरून शंभर करून दुप्पट महसूलाचे रेल्वेचे नियोजन आहे. त्यासाठी साडेसहा कोटी खर्च करून मालधक्क्यावर रस्ते, सिमेंटची पटांगणे, पथदीप, नवीन शेडची कामे झाली आहेत. नवीन रेल्वेमार्ग, प्लॅटफॉर्म सुधारणा कामे सुरु आहेत. माथाडी कामगार हा येथील कणा आहे त्यांच्यासाठी रेल्वे आरोग्य शिबीरे घेते. स्वच्छतागृहे, जलकुंभ, कॅन्टीन सुविधा माथाडींना दिल्या आहेत.

दोन वर्षापूर्वी बांगलादेशला रेल्वेने प्रथमच कांदा निर्यात झाली. त्याचा प्रारंभ नाशिकरोडहून झाला. आठ मालगाड्या कांदा निर्यात झाल्याने देशाला परकीय चलन तर शेतकर्‍यांना रोकड मिळाली. शेतकर्‍यांसाठी क्रांतीकारक ठरलेली देशातील पहिली किसान ट्रेन देवळालीहून सुरु झाली. त्यात मालधक्क्याचे महत्वाचे योगदान आहे. करोना काळात नाशिक, नगरला ऑक्सिजन टँकर पुरविण्याचे काम मालधक्क्याने केले. नाशिकरोड मालधक्क्याहून महिंद्राची दरमहा सतराशे वाहने देशभरात जातात. त्यामुळे रस्ता वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघात टळतातच परंतु, खर्च व वेळेत बचत झाल्याचा लाभ ग्राहकांना मिळतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com