Gold Rate : सोने आज पुन्हा झाले स्वस्त

सोन्याचे भाव सलग तिसर्‍या दिवशी घटले
Gold
Gold

दिल्ली | Delhi

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या वायदा भावात घट पाहायला मिळाली. सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १२.८० डॉलर म्हणजे ०.६६ टक्के घटीसह १८५६ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.४८ टक्के म्हणजे ८.९० डॉलरच्या घटीसह १८५४.४४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

आज मुंंबई मध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 50 हजार 712 वर आला आहे. हेच दर मागील महिन्यात सर्वोच्च स्तरावर पोहचले होते, ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात तर सोने 56,000 रुपये प्रति तोळा विकले जात होते. आजचे प्रमुख शहरातील सोन्याचे दर पाहिल्यास, मुंंबई मध्ये प्रती तोळा सोने 50,712 (24 कॅरेट) ने विकले जात आहे, तर राजधानी दिल्ली मध्ये मात्र अजुनही किंंमत 54 हजार 085 इतकी आहे. बंंगळुरु मध्ये आज 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 53 हजार 468 ने विकलं जातं आहे आणि चेन्नई मध्ये 53,265, कोलकाता मध्ये 52 हजार 472, अहमदाबाद मध्ये 52 हजार 143 अशा सोन्याच्या किंंमती आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com