Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासोन्याच्या दरात पुन्हा घसरण: जाणून घ्या आजचा भाव

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण: जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली :

भारताच्या बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच आहे. सोमवारी मार्चनंतरही सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण झाली.

- Advertisement -

वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. या घसरणीमुळे सोने पहिल्यांदाच प्रति तोळा ५० हजारांखाली आले आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा ४९ हजार ४६० आहे. एमजीएक्सवर (MCX)सोमवारी सकाळी ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे दर ०.१४ टक्क्यांनी घसरत ४९ हजार ६०० वर आला. एमसीएक्सवर डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचे दर सध्या ०. १३ टक्क्यांनी घसरत ४९,५८५ झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर गेले होते. त्यात आता सुमारे ६५०० रुपयांची घसरण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या