Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासोनसाखळी चोरटे ताब्यात

सोनसाखळी चोरटे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील पायी जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे लुटणाऱ्या (Chain Snatchers )दोघा संशयितांना युनिट दोनच्या पथकाने ( Crime Branch Unit -2, Nashik )ताब्यात घेतले आहे. त्यांनी सात गुन्हे केल्याची कबुली देत जवळपास सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

- Advertisement -

जानेवारी महिन्यात बळी मंदिरात दर्शन करून घरी जाणाऱ्या मंगल अनिल राउळ या महिलेच्या गळ्यातील दूचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन अनोळखी संशयितांनी सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेली होती. हि सोनसाखळीची चोरी आडगाव भागात राहणारा मुसा सैयद याने त्याच्या साथीदारासह केली असल्याची माहिती पोहवा सोमनाथ शार्दुल यांना मिळाली होती.

यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, युनिट दोनमधील पोउपनि पोपट कारवाळ, पो.हवा सोमनाथ शार्दुल, विजय वरंदळ, चंद्रकांत गवळी, विवेक पाठक, पो. अ. राहुल पालखेडे यांनी अंबड लिंकरोड वरील पाटील पार्क येथे सापळा रचला असता संशयित मुसा सय्यद आणि त्याचा साथीदार सोमनाथ हरीशचंद्र त्रिभुवन हे काळ्या रंगाची मोटर सायकल (एम.एच. १५ डी.बी. ३५०१) हिचेवर आले असता त्यांना ताब्यात घेतले.

त्यांना ताब्यात घेवून संशयितांकडे चैन स्नॅचिंगबाबत चौकशी केली असता त्यांनी पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र, त्यांना पोलिसांनी इंगा दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी अंबड, आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, उपनगर भागातील रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि चैन खेचून चोरी केल्याचे कबूल केले.

चोरी केलेले सोन्याचे दागिणे संशयितांनी ज्या सोनारला विक्री केल्याचे सांगीतले त्या सोनाराकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यामध्ये अंबड, म्हसरूळ हद्दीतील दोन आणि आडगाव, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा सात गुन्ह्यातील ३ लाख २४ हजार ४५० रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. तसेच, ८० हजार रुपयांची दुचाकी क्रमांक एम एच १५ डीबी आणि ८० हजार रुपयांची सीडी डिलक्स दुचाकी क्रमांक एम एच १५ बी. व्ही. ५०८४ आणि ५० हजार रुपये किमतीची ज्युपीटर दुचाकी क्रमांक एम एच १५ एच. आर. ६७०८ असा एकूण ५ लाख ३४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल संशयितांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या