Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी ऑनलाईन खरेदी करता येणार

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी ऑनलाईन खरेदी करता येणार

नाशिक । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे सराफ बाजाराचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी सोडावे लागत असून अंदाजे चाळीस कोटींची उलाढाल ठप्प राहणार आहे. मात्र, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करता यावी यासाठी सराफ बाजाराकडून ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना हा शुभ मुहूर्त साधता येणार आहे.

- Advertisement -

हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैंकी अक्षय तृतीया एक समजला जातो. अक्षय म्हणजे चिरंतन टिकणारे. त्यामुळे या दिवशी सोने व चांदीच्या वस्तू खरेदीला ग्राहक पसंती देतात. पेशवेकालीन परंपरा असलेल्या सराफ बाजारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. दरवर्षी या दिवशी साधारणत: 40 कोटींची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे सोने चांदिला नवी झळाळी मिळते. तसेच लग्नसराईसाठी देखील या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या वस्तू व दागिने खरेदीला पसंती दिली जाते.

पण गतवर्षीप्रमाणे यंदा देखील लॉकडाऊन असून अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहकांना साधता येणार नाही. पण आपल्या ग्राहकांसाठी सराफ व्यावसायिकांनी ऑनलाईन खरेदी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक या मुहूर्तावर ऑनलाईनद्वारे दागिने व वस्तू बुक करु शकतात. लॉकडाऊन उठल्यावर ग्राहक या वस्तू घेउन जाऊ शकतात. या माध्यमातून दुकानदार व ग्राहक या दोघांनाही लॉकडाऊनचे उल्लंघन न करता हा मुहूर्त साधता येईल.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला बघितले जाते. अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावरील खरेदी केलेले सोने अक्षय राहते. त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करीत असतात. या वेळेस लॉकडाऊन असला तरी काही सराफ व्यवसायिकांनी ऑनलाइन सोने खरेदी साठी व्यवस्था केलीली आहे. तरी सर्व ग्राहकांनी खरेदी साठी आपल्या पारंपरिक सराफांकडेच संपर्क करावा

चेतन राजापूरकर माजी अध्यक्ष, नासिक सराफ असोसिएशन

- Advertisment -

ताज्या बातम्या