Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याढोल महावादनाने दुमदुमणार गोदातीर

ढोल महावादनाने दुमदुमणार गोदातीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित महावादन (एक हजार ढोलांचे समूह वादन) आज (दि.18) सायंकाळी सहा वाजता गोदातीरी होणार आहे.

- Advertisement -

नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणार्‍या विविध सामूहिक कार्यक्रमांना आज सायंकाळपासून सुरुवात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पहिले पुष्प अर्पण करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी पर्यावरण रक्षण (पंचमहाभूते) हा विषय घेऊन राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती व नाशिक महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.

या महावादनात एकूण 30 पथके सहभागी होणार असून एक हजार ढोल व 200 ताशे असणार आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला सलग 45 मिनिटे महावादन सादर होईल. त्यानंतर गारद व सामूहिक शिवस्तुती सादर केली जाईल. मग सामूहिक वंदे मातरम् म्हणून कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व उपजिल्हाधिकारी, भूमी अधिग्रहण नाशिकचे गणेश मिसाळ हे उपस्थित राहणार आहेत आहेत.

या महावादन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांंत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी, महावादनप्रमुख मिलिंद उगले व रोहित गायधनी यांनी केले आहे.

गोदावरी आरती उपक्रमात अभिप्राय नोंदवा

गोदावरी नदीचे पावित्र्य जपून तिचे संवर्धन करण्यासाठी अयोध्या, हरिद्वार, वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी नदीच्या काठावर ‘गोदावरी आरती उपक्रम’ महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी गोदावरी आरती उपक्रमाबाबत सूचना व अभिप्राय 31 मार्चपर्यंत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

गोदावरी आरती उपक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असून सुजाण नागरिक म्हणून येणार्‍या पिढीला निर्मळ स्वच्छ गोदावरी नदीचे रूप दाखवणे आवश्यक आहे. त्याकरता शासकीय- निमशासकीय संस्था, शाळा, संगीत व कला प्रशिक्षण संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, कलावंत तसेच खासगी संस्था यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी गोदावरी आरतीचे बोल तसेच आरतीच्या अनुषंगाने इतर काही बाबी, सूचना व अभिप्राय असल्यास ते collector.nashikmaharashtra.gov.in , pwdivisionnashikgmail.com या इमेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना पेटीत 31 मार्चपर्यंत द्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या