Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : गोदावरी नदी आयसीयूत; काय म्हणाले डॉ. राजेंद्र सिंह?

Video : गोदावरी नदी आयसीयूत; काय म्हणाले डॉ. राजेंद्र सिंह?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दक्षिणेकडील गंगा म्हणून प्रसिद्ध नाशिकची गोदावरी (Godavari) ही कानपूरच्या गंगेपेक्षा खूप चांगली आहे, मात्र ती सध्या आयसीयूमध्ये (ICU) आहे. गंगागोदावरीला आपण आई म्हणून संबोधित करतो….

- Advertisement -

त्यामुळे आईचे पाल्य म्हणून नाशिककरांसह लोकप्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी तसेच प्रशासनाने त्याच्यावर योग्य उपचार केल्यावर ती लवकर आईसीयूमधून बाहेर येईल व पुन्हा खळखळून वाहणार यासाठी महापालिका (Nashik NMC) तसेच स्मार्ट सिटीने (Smart City) योग्य नियोजन करावे, अशा प्रकारच्या सूचना आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांनी केले आहे. नदीला मोकळेपणाने वाहू द्या, तिला बंदिस्त करू नका असा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.

आज स्मार्ट सिटी कार्यालयात राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीमध्ये स्मार्ट सिटी अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्या समवेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र सिंह हे बोलत होते.

बैठकीला महापालिका आयुक्त रमेश पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे ,अधीक्षक अभियंता शिवकुमार वंजारी, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले तसेच पर्यावरण तसेच गोदा प्रेमी प्राजक्ता बस्ते, देवांग जानी, राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिककरांच्या मनांमध्ये आजही गोदावरी नदीबाबत त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसून येत आहे. यामुळे गोदावरीचे पौराणिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

एखादी सिटी स्मार्ट करायचे असेल तर तेथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला पाहिजे तसेच पाण्याचे योग्य नियोजन व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वीच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत याबाबत बैठक झाल्याचे सिंह यांनी सांगितले तसेच रिव्हर व सिव्हिर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यासंदर्भात त्यांनी एका वर्षात आपण काम करून दाखवणार असल्याचे विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पाहा व्हिडीओ….

- Advertisment -

ताज्या बातम्या