Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागोदामाई पुन्हा खळाळली; होळकर पुलाखालून 'इतका' विसर्ग

गोदामाई पुन्हा खळाळली; होळकर पुलाखालून ‘इतका’ विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सायंकाळीदेखील नाशिक शहराला पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे….

- Advertisement -

यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर धरणातून सध्या २ हजार ५४६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर नाशिकमध्ये आज विक्रमी ७६.८ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Video : नाशकात तीन तासात ‘इतक्या’ पावसाची नोंद

गंगापूर धरणातून विसर्ग आणि शहरात झालेला जोरदार पाऊस यामुळे होळकर पुलाखालून ३ हजार ५९० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. यामुळे परिसरातील टपऱ्या हलविण्याचे काम सुरु झाले आहें.

नाशकात पावसाचा कहर; गाडगे महाराज पुलाखाली अडकली बस

पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या