स्मार्ट सिटीच्या 'या' कामावर गोदावरी प्रेमींची तीव्र नाराजी

स्मार्ट सिटीच्या 'या' कामावर गोदावरी प्रेमींची तीव्र नाराजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोदावरीच्या (goadvari) पवित्र कुंडाच्या प्रश्नावर स्मार्ट सिटीचे (Smart City) सूरू असलेले वेळ काढूपणाचा प्रत्यय पून्हा एकदा गोदा प्रेमींना आल्याने आता कंपनीशी प्रेमाने नव्हे तर कायद्याच्या भूमिकेतूनच भांंडण्याची वेळ आली असल्याचा सूतोवाच संघर्ष समितीने केला आहे.

गोदावरी तटाच्या (Godavari Coast) विविध प्रश्नांसाठी स्मार्ट सिटीच्या दालनात सातत्याने बैठका झाल्या. यात माघी गणेश जयंती पूर्वी गणपती मंदिराची पूर्नस्थापना करण्याचे आश्वासन त्यांन पूर्ण केले असले तरी निळकंठेश्वरच्या पायर्‍या पूर्ण करण्याचे आश्वासन हवेत विरल्याचे दिसून येत आहे. येत्या 31 जानेवारी पायर्‍यांचे पर्यंत हे काम पूर्ण करण्याच नव्याने दिलेला शब्द पून्हा एकदा केवळ अश्वासन ठरले आहे. केवळ पायर्‍यांचे कटींग येऊन पडलेले असताना केव्हा लावणार असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत.

स्मार्टसिटीद्वारे (Smart City) वेळोवेळी कबूल केलेल्या गोष्टी पूर्ण होत नसल्याने व सतत पाठपूरावा करण्यापेक्षा त्यांना समजणार्‍या कायद्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून काम पूर्ण करुन घेण्याची भूमिका गोदा प्रेमी सेवक समितीने (Goda Premi Sevak Samiti) हाती घेतलेली आहे. निळकंठेश्वर मंदिर पायर्‍या, देवीच्या मंदिराचा पूरातन सांडवा, बारा कुंडातले काँक्रीट (Concrete) आदी कामे 31 जानेवारी पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आश्वासन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Smart City CEO Sumant More) यांनी पहाणी दौर्‍यात दिले होते. ते पूर्ण होताना दिसून येत नाही.

त्यामुळे आता संयम संपूष्टात येू लागला असून, स्मार्ट सिटीला संयमाची भाषा समजत नसल्याने त्यांना समजणार्‍या भाषेत आता समज देण्याची भूमिका गोदा प्रेमी सेवक समितीने हाती घेण्याचे निश्चित केले आहे.स्मार्ट सिटीच्या या भूमिकेवर गोदा प्रेमी सेवक समितीच्या देवांग जानी, कैलास देशमुख, बाबासाहेब राजवाडे, बबलू परदेशी, नरेंद्र दारणे, चिराग गुप्ता आदींसह सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com