Video : गोदावरीला पुन्हा पूर; होळकर पुलाखालून 'इतके' पाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे .

गंगापूर धरणातून सध्या ७९५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तर होळकर पुलाखालून १०८५४ क्युसेक पाण्याचा विसार्गे होत असल्याने गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे.

दरम्यान पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास टप्प्या टप्प्याने आणखी पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.गोदावारी नदीला पूर आल्याने रामसेतू पुला नजीकच्या टपऱ्या सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात येत आहेत .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com