Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto गोदाकाठच्या फरशा पुन्हा उखडल्या

Photo गोदाकाठच्या फरशा पुन्हा उखडल्या

गोदाकाठी (Godavari River) मोठा गाजावाजा करत बसवण्यात आलेल्या फरशा पहिल्याच पुरात उखडल्या असून वाहून गेल्या आहेत. या निकृष्ट कामांमुळे गोदाप्रेमी (Godapremi Nashikites) संतप्त झाले आहे.

गाेदाकाठ परिसरात स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून काेट्यवधी रुपये खर्च करत सुशाेभीकरणाचा देखावा हाेत आहे. गाेदावरीला आलेल्या छाेट्या पुरामुळे रामकुंड परिसरात बसविलेल्या फरशा काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहासाेबत वाहून गेल्या.

- Advertisement -

गाेदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलमेंट ऍण्ड ब्युटिफिकेशन या ७४ काेटी रुपयांच्या प्राेजेक्ट अंतर्गत गाेदाकाठ परिसरात सुशाेभीकरण हाेत आहे.

त्याअंतर्गत अहिल्याबाई हाेळकर पूल ते गाडगे महाराज पूल तसेच हाेळकर पूल ते रामवाडी एक बाजू अशा दाेन टप्प्यात ३२ हजार स्क्वेअर फूट परिसरात दगडी फरशा बसवून लेव्हिंग करण्याचे काम सुरू आहे. मात्र बुधवारी आलेल्या पुरात अनेक फरशा उखडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. या ठिकाणी कार्यरत असलेले मजूर आता पूर ओसरल्यामुळे फरशा शोधत आहे. पाण्यातून काढून त्या फरशा सुरक्षित ठिकाणी नेत आहे.

Photo : गोदाकाठी दुकानदारांची अशी झाली धावपळ

रामकुंड परिसरातील रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या