Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटीचा गोदा प्रकल्प ठरणार ऑक्सिजन बँक

स्मार्ट सिटीचा गोदा प्रकल्प ठरणार ऑक्सिजन बँक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीच्या (Smart City) प्रकल्पातील बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदा प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून, विविध सेवा सुविधांच्या माध्यमातून उपेक्षित असलेला वाघाडी परिसर हा अत्यंत देखणा आणि स्मार्ट पर्यटन स्थळ म्हणून लौकिकास पावेल असा विश्वास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केला…

- Advertisement -

स्मार्ट सिटीच्या सुंदर नाशिकच्या विवीध विकासकामांतील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून गोदा प्रकल्प गणला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 73 कोटी 74 लाख रुपये खर्च निर्धारित करण्यात आलेला आहे. सुमारे साडेतीन एकरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात आकर्षक बांधणीतील ओपन रेस्टॉरंट उभारण्यात आलेला आहे.  

या रेस्टॉरंट समोरच बोर्डेक्स मिरर बनवण्यात आला आहे. त्यासोबतच या ओपन रेस्टॉरंट च्या समोरील बाजूस वॉटर कॅस्केड तयार करण्यात आलेला आहे आकर्षक असा गोदापार्कचा प्रवेश द्वार ओलांडल्यानंतर अ‍ॅम्पिथिएटर मध्ये प्रवेश होतो या ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी छान असा रॅम्प उभारणयात आलेला आहे.

IMD कडून राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट… आरोग्याची ‘या’ पद्धतीने काळजी घ्या आणि सुरक्षित रहा

अ‍ॅम्पिथिएटरच्या समोर विविध रंगांनी नटलेल्या पाण्याच्या फवार्‍यांची वॉटर स्क्रीन उभारण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूंनी छान असे देखावा त्यामुळे निर्माण होणार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील आणि बाहेरील बाजूला कुंड्यांची आकर्षक सजावट करून पंचवटीची पाच खांबे तयार करण्यात आली आहे.

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

जुन्या वाघाडीच्या लोखंडी ब्रिज पासून विक्टोरिया पुलापर्यंत  तीनशे मीटरचा गोदावरी वॉक तयार करण्यात आला आहे. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोशनी करण्यासोबतच संपूर्ण गोदापार्क व वाक परिसरात 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत ठीक ठिकाणी वाय-फायची सुविधा देण्यात आली असून म्युझिक सिस्टमच्या माध्यमातून मंद असं संगीत वाजत राहणार आहे.

माय गोदा हे सेल्फी पॉईंट ही उभारण्यात आलेला आहे. बोटीतून जलतरण करण्यासाठी उद्यान ते बोट यांच्या दरम्यान जेट्टी ब्रिज उभारण्यात आली आहे उद्यानाच्या बाहेरही बाजूस नदी पात्रात लगत भारतीय प्रजातीच्या झाडांची दाटवनराई निर्माण करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं; म्हणाले, आमच्या पक्षाचे…

या उद्यानात सुमारे 100 ते 150 विविध जातींची गुलाब फुले लावण्यात येणार आहेत. त्या संपूर्ण उद्यानामध्ये पन्नास ते साठ हजार झाडे लावून उद्यानाला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नाशिक साठी ही ऑक्सिजन बँक ठरणार आहे.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.

- Advertisment -

ताज्या बातम्या