Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशFacebook, Insta, WhatsApp नंतर आता झाले Gmail Down

Facebook, Insta, WhatsApp नंतर आता झाले Gmail Down

काही दिवसांपूर्वीच काही सोशल मीडिया तात्पुरते बंद झाले होते. यामध्ये फेसबुक, इन्टाग्राम आणि व्हॉट्सऍपचा समावेश होता. यानंतर आता जी-मेलही (Gmail Down) डाऊन झालं आहे. गुगलची लोकप्रिय ई मेल सेवा Gmail चा जगभरात वापर केला जातो. Gmail युझर्सना कोणतेही मेल येत नाही आहेत किंवा पाठवताही येत नाही आहेत. Gmail बाबत ट्विटरवर तक्रारींचा पाऊस आहे.

खडसेंच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

- Advertisement -

Gmail वापरण्यास भारतातील काही भागातील यूजर्सला समस्या येत आहे. ईमेल पाठवण्यास अडथळा येत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, ६८ टक्के यूजर्सने वेबसाइटमध्ये समस्या येत असल्याची माहिती दिली आहे. १८ टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शन आणि १४ टक्क्यांनी लॉग इन समस्या येत असल्याची माहिती दिली आहे.

#gmaildown ट्वीट

इंटरनेट सर्विस आउटेजवर नजर रखने वाली साइट Down Detector नुसार 68 टक्के यूजर्सला वेबसाइट एक्सेस होत नसल्याची तक्रार केली आहे. 18 टक्के यूजर्सला सर्व्हर कनेक्शनसंदर्भात रिपोर्ट दिला आहे. तर 14 टक्के यूजर्सला लॉगिन करण्यात अडचण येत आहे. अनेक युजर्सने #gmaildown ट्वीट केले.ट्विटरवर याबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहे. #GmailDown आणि जीमेलसंबंधित हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. कंपनीकडून यासंदर्भात अजून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या