चीनच्या सरकारी वृतपत्राची धमकी : युद्ध काळात चीनी सेना अटल टनेल ‌‌उद्धवस्थ करेल

माेदी-जिनपिंग
माेदी-जिनपिंगKenzaburo Fukuhara/Kyodonews

नवी दिल्ली

भारताने तयार केलेला अटल टनेलवरुन चीनचा तळफळाट सुरु झाला आहे. भारतास या टनेलचा फारशा फायदा होणार नसल्याचे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या ‘अटल टनेल’ या बोगद्याचे शनिवारी (ता. २ ऑक्टोंबर) पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना मोदी यांनी संकेतात भारत सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा मजबुत करत असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले होते, अटल बोेगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहचणे देखील आता सोपे होणार आहे.

मोदी यांच्या वक्तव्ये चीनला चांगलेच झोंबले. यासंदर्भात चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने रविवारी लेख प्रसिद्ध केला. त्यात म्हटले की, शांततेच्या कालखं़डात भारतास अटल टनेलचा फायदा होईल. परंतु युद्धाचा काळात त्याचा काहीच फायदा होणार नाही. चायना पीपल्स आर्मीत हा बोगदा उद्धवस्थ करण्याची क्षमता आहे. त्यासाठी चायना आर्मीकडे अनेक मार्ग आहे. यामुळे भारत व चीनच्या भविष्यासाठी शांततामय मार्गाने मार्गक्रम करणे गरजेचे आहे.

The tunnel will be of great help to Indian troops and their provision of supplies in peacetime; however, it has no benefit in wartime, especially if military conflict breaks out. The Chinese People's Liberation Army has means to make this tunnel unserviceable.

ग्लोबल टाईम्सने भारताला संयम कायम ठेवण्याचा सल्ला देत म्हटले की, कोणताही टनेल भारताच्या युद्धाच्या क्षमतेत वाढ करु शकत नाही. भारतापेक्षा चीनची क्षमता निश्चितच चांगली आहे. भारत चीनपेक्षा खूपच मागे आहे. आता शांततेचा काळ आहे. परंतु युद्धाच्या कामात अटल टनेलचा काहीच फायदा होणार नाही, हे भारतास लक्षात येत नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com