Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याMantralaya News : मंत्रालयाजवळ ब्लास्ट; वाहनांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या

Mantralaya News : मंत्रालयाजवळ ब्लास्ट; वाहनांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या

मुंबई | Mumbai

मंत्रालयाजवळील (Mantralaya ) आजूबाजूच्या परिसरात ब्लास्ट (Blast) होऊन मंत्रालयाच्या इमारतीच्या आणि वाहनांच्या काचा (Vehicle Glass) फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

मोठी बातमी! मोदी सरकारने बोलवलं संसदेचं विशेष अधिवेशन; नेमकं कारण काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या बाहेर मेट्रोचे (Metro) काम सुरु आहे. या मेट्रोच्या कामासाठी ब्लास्ट करणे सूरू होते. यावेळी ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने आले. त्यावेळी मंत्रालयातील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. तसेच मंत्रालयाच्या खिडक्याच्या काचा देखील फुटल्या आहेत.

Bacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, या घटनेमध्ये सुदैवाने आतापर्यंत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली असून यात मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मंत्रालयासारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील परिसरात अशी घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

- Advertisment -

ताज्या बातम्या