Wednesday, April 24, 2024
Homeधुळेवॉटरग्रेसला आठ दिवसात वसुलीची नोटीस बजवा

वॉटरग्रेसला आठ दिवसात वसुलीची नोटीस बजवा

धुळे Dhule । प्रतिनिधी

महापालिकेची बदनामी (Defamation of the Municipal Corporation) करणार्‍या आणि कचरा करणार्‍या वॉटरग्रेसचा (Watergrace) अधिकार्‍यांना (authorities) कळवळा का, वॉटग्रेसला (Watgress)वसुलीसाठी नोटीस (Notice for recovery) का बजावली नाही, असा सवाल (executed) स्थायी समिती सभापती (Standing Committee Chairman) शितल नवले (Shital Navle) यांनी उपस्थित करून दप्तर दिरंगाई (Office delay) का करण्यात आली, असा सवाल प्रशासनाला (Question to the administration) केला. वॉटरग्रेसला आठ दिवसात वसुलीची (Eight days’ notice) नोटीस द्या, अन्यथा तुमच्याकडूनच वसुली करून कारवाई करेल, असा इशारा सभापतींनी दिला.

- Advertisement -

दरम्यान, सभा सुरू होवून सुमारे वीस मिनिटे होवूनही मनपा प्रशासनाचे प्रमुख आयुक्त देविदास टेकाळे स्थायीला उपस्थित न राहिल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला व सभा तहकुब करण्यात आली.

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वायपेयी सभागृहात आज स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, संजय जाधव, नागसेन बोरसे, साबीर शेख, किरण अहिरराव, बन्सीलाल जाधव, नरेश चौधरी, नगरसेविका फातेमा अन्सारी, किरण कुलेवार, मंगला चौधरी, प्रतिभा चौधरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीला उपायुक्त संगिता नांदुरकर व पल्लवी शिरसाठ या एलएलबी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभेला सुरूवात झाली. अजेंड्यावर 19 विषय होते. तत्पुर्वी नगरसेवक संजय जाधव यांनी मनपाच्या अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलात झालेल्या घुसघोरीचा मुद्दा मांडला. वारवांर तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. जर नगरसेवक तक्रार त्याची दखल घेतली जात नसेेल तर सर्वसामान्य नागरिकांनी तरी काय अपेक्षा करावी,असे सांगत त्यांना पत्र देवू थेट गुन्हे दाखल करा. त्यामुळे पुन्हा कोणी असे अतिक्रमण करणार नाही, असे सांगितले.

त्यावर अभियंता कैलास शिंदे यांनी हे गाळे वसुली विभागाकडे हस्तांतरीत केले असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती नवले यांनी अति. आयुक्तांनी संकुलाला भेट द्यावी. गणेशोत्सवानंतर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्याकडून ते ताब्यात घ्यावेत, असे सांगितले.

नागसेन बोरसे यांनी वॉटरग्रेस कंपनीमुळे मनपाची बदनामी झाली आहे. कंपनीने मनपावर पावणे दोन कोटींचा दावा दाखल करण्याचा घाट घातला आहे. वॉटरग्रेसन 289 कर्मचारी पुरविले आवश्यक होते. मात्र 145 कर्मचारी दिले. उलट वॉटरग्रेसकडे घेणे असून मनपाने त्याच्यावर काय दावा व कारवाई केली, असा सवाल केला. तसेच वॉटरग्रेस लवाद स्थापन करण्याच्या तयारी आहे. त्यांनी मनपाच्या एखाद्या निवृत्त अधिकार्‍याला नियुक्त केल्यास ते मनपाचे हित बघणार नाहीत. ते लवादाला मॅनेजही करू शकतात. वॉटरग्रेसकडे मनपाचे पावणे चार ते चार कोटी निघू शकतात, असे सांगितले. त्यावर मनपाचे अधिकारी माईनकर यांनी सांगितले की, वॉटरग्रेसने 289 पैकी केवळ 145 कर्मचारी भरले. त्यांच्याकडे 70 ते 80 लाखांची गाड्यांच्या दुरूस्तीसह चार ते पावणे चार कोटींचा खर्च काढला आहे. त्यांची टिपणी देखील तयार केली असून त्यावर आयुक्तांकडे सहीसाठी ठेवली आहे. त्यानंतर नोटीस बजावण्यात येईल, असा खुलासा केला.

त्यानंतर सभापती नवले यांनी आपण वॉटरग्रेसला हद्दपार केलेले आहे. त्यांच्यावर काऊंटर क्लेम करण्यास सुचना दिल्या होत्या. तरी देखील दप्तर दिरंगाई का केली जाते. चार चार कोटींची क्लेम असे पेंडीग राहत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे. जर पुढच्या सभेपर्यंत सभेपर्यंत वॉटरग्रेसला नोटीस बजवा. अन्यथा तुमच्याकडून ती वसूली करू, असा ठरावच केला जाईल. तसेच संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करून खाते बदल केले जातील, अशा इशारा दिला. त्यानंतर नरेश चौधरी यांनी कुमार नगरातील पुलाच्या रस्त्याचा प्रश्न मांडला. या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यावर शाळेकरी मुले अधिक वापरतात. या रस्त्याचे इस्टीमेंट तयार असूनही खड्डे का बुजवित नाहीत, असा सवाल केला.

त्यावर खुलासा करतांना अभियंता कैलास शिंदे म्हणाले, शहरातील रस्त्यांची दुरूस्तीसाठी तरतुद आवश्यक आहे. तसेच या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून नुसते खड्डे बुजवून काम होणार नाही. तर डांबर टाकून काम करावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर अजंड्यावरील विषय घेण्यात आले.तेव्हा नागसेन बोरसे यांनी अजेंड्यावर आठ ते नऊ विषय हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे आयुक्त हजर असणे आवश्यक होते. त्यामुळे सभा तहकुब करावी, अशी मागणी केली.

तसेच नगरसेवक किरण अहिरराव यांनी आधी मागचे विषय क्लेअर केला. त्यानंतर पुढेच विषय घ्या. तोपर्यंत सभा तहकुब करावी, असे सांगितले. चर्चेअंती सभापती नवले यांनी अजेंड्या महत्वाचे विषय आहेत. त्यावर प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचा खुलासा आवश्यक असे सांगत सभा तहकुब केल्याचे जाहिर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या