Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'देशदूत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना 'गिरणा गौरव' पुरस्कार

‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गिरणा गौरव प्रतिष्ठाणचे (Girna Gaurav Pratishthan) गिरणा गौरव पुरस्कार (Awards) आज जाहीर करण्यात आले आहेत….

- Advertisement -

यंदा पद्मश्री नीलिमा मिश्रा (Nilima Mishra) , ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस (Rajan Gavas), गीतकार गुरु ठाकूर (Guru Thakur), दैनिक देशदूतच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Dr. Vaishali Balajiwale) यांच्यासह एकूण दहा मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष कवी राजू देसले (Raju Desale) यांंनी दिली.

येत्या ५ एप्रिलला महाकवी कालिदास कला मंदिरात पुरस्काराचेे वितरण जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह (Dr. Rajendra singh) यांच्या हस्ते व आनंद अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उध्दव आहेर (Uddhav Aher) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

पुरस्कार्थींमध्ये वरील मान्यवरांसह कवियत्री सुमती लांंडे, शिक्षणाधिकारी मच्छिंद्रनाथ कदम, नाटककार शंभू पाटील, डॉ. अनिल निकम, खंडू मोरे, शिल्पा देशमुख यांचादेखील समावेश आहे.

मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेले 24 वर्ष अव्याहतपणे गुणीजनांची निवड करुन हे प्रतिष्ठाण पुरस्कार देत आहे. यंदाची निवड ही निवड समीतीचे अध्यक्ष राजू देसले, कवी प्रकाश होळकर, डॉ. निर्मोही फडके, स्वप्नील तोरणे, प्रवीण बांदेकर यांच्या समीतीने केली, अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या