Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यागिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, अनिल देशमुखांना...

गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, अनिल देशमुखांना…

नाशिक | Nashik

माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, त्यांनी म्हटल्याप्रमाणे मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात तुरुंगात असतांना त्यांना भाजपची (BJP) ऑफर आली होती.

- Advertisement -

तेव्हा जर ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आधीच कोसळले असते, पण मी ती स्वीकारली नाही कायद्यावर विश्वास ठेवला असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात बॉम्ब फोडला आहे.  मात्र, अनिल देशमुख यांच्या या विधानावर भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देशमुखांवर आज चांगलाच पलटवार केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्यासाठी प्रस्ताव दिला होता. अनिल देशमुख यांनी निवडणूक (Election) होण्यापूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी दोनदा प्रस्ताव दिला होता.

करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी – मुख्यमंत्री

पण ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आले. आता झालेल्या गोष्टीवर त्यांनी बोलू नये. आपली चौकशी सुरू आहे. आपण जामीनावर आहेत. आपल्याकडे जे पेपर आणि पुरावे आहेत ते ईडीकडे ठेवा आहे असा सल्लाही यावेळी गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना माध्यमांशी बोलताना दिला आहे.

अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. 13 महिने अनिल देशमुख तुरुंगात होते. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. कारवाई दरम्यान त्यांना ही ऑफर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. तुरुंगात असतांना ऑफर आली होती मी ती नाकारली आणि तडजोड केली नाही.

नाशिक : झाडाची फांदी कोसळून वाहनांचे मोठे नुकसान

तेव्हा ती ऑफर स्वीकारली असती तर सरकार अडीच वर्षापूर्वीच पडले असते. पण माझा न्यायावर विश्वास होता म्हणून बाहेर येण्याची वाट पाहत होतो. त्यावरच गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या