भाजप नेते गिरीश महाजन यांना दिलासा : 24 जानेवारीपर्यत कारवाई न करण्याचे निर्देश


भाजप नेते गिरीश महाजन यांना दिलासा : 
24 जानेवारीपर्यत कारवाई न करण्याचे निर्देश

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी (pune police)जळगावमध्ये काही ठिकाणी छापे टाकले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणी जळगावातून (Jalgaon)टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी उच्च न्यायालयाने गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दिलासा देत 24 जानेवारीपर्यंत कोणतेही कारवाई न करण्याचे आदेश दिले.

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून गिरीश महाजन यांच्यांवर कारवाई होणार होती. या संदर्भातील तक्रार सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी टेम्पो भरुन कागदपत्र नेली

दोन दिवसांपुर्वी पुणे पोलिस जळगावला आले. गिरीश महाजन यांच्यविरोधात नोंदवण्यात आलेल्या संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. ही कागदपत्रे पुणे पोलिसांनी पुण्याला नेली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com