
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik Munciple Corporation) घंटागाडी कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. किरण पुराणे (Kiran Purane) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे....
पुराणे यांनी आत्महत्या करण्याआधी एक संदेश सोशल मीडियात (Social Media Viral Post) पाठवलेला होता. या संदेशात सुपरवायझर (Superviser) आणि ठेकेदाराच्या (Contractor) जाचाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. मयत किरण हे नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागात (Nashik nmc east division) कार्यरत होते. सोशल मीडियात किरण यांच्या नावाचा एक संदेश पोस्ट झालेला आहे.
आज सकाळी साडेआठला आत्महत्येबाबत माहिती समजली. आत्महत्या केलेला कामगार गेल्या १५ दिवसांपासून कामावर नसल्याचे समजते. कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून डिस्टर्ब असल्याची माहिती आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत पोलीस तपासात पुढे येईलच.
डॉ आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग नाशिक मनपा