सज्ज राहा, कठोर पावले उचला!

करोना रोखण्यासाठी महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश
सज्ज राहा, कठोर पावले उचला!
करोना

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

देशात करोना Corona संसर्गाने पुन्हा उचल खाल्ली आहे. बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार Central Government सतर्क झाले आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रज्ञासह 8 राज्यांना केंद्र सरकारकडून विशेष निर्देश देण्यात आले आहेत. करोनाविरोधात लढण्यासाठी अधिक सज्ज राहण्याच्या आणि लसीकरणाचा Vaccination वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण Union Health Secretary Rajesh Bhushan यांनी दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड राज्यांना पत्र पाठवले असून करोना चाचण्या वाढवणे, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करणे तसेच लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मृत्यूदरात वाढ होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दिल्लीत लागू करण्यात आलेले ‘जीआरएपी’ मॉडेल देशभर लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे भूषण यांनी सांगितले.

करोनाच्या नवीन अवतारामुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. देशातील ‘ओमिक्रॉन’ बाधितांची संख्या 961 वर पोहोचली आहे. त्यात 263 रुग्णसंख्येसह दिल्ली देशात अव्वलस्थानी असून 252 बाधितांसह महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

नाशकात ‘ओमायक्रॉन’चा पहिला रूग्ण

जेनॉम् सिक्वेंसिंगमध्ये नाशिक शहरात ‘ओमायक्रोन’चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. रुग्णात कोणतीही लक्षणे (नॉन सिम्प्टमिक) दिसत नाहीत. रूग्णाची प्रकृती व्यवस्थित आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र करोनाच्या या प्रकाराच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता करोनाबाबतचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. लसीकरणाला प्राधान्य देणे हे सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. लस न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

बाधितांच्या संख्येत 43 टक्के वाढ

‘ओमायक्रॉन’ विषाणूने जगभर चिंता वाढवली आहे. भारतातसुद्धा करोनाबादितांच्या संख्येने झपाट्याने वाढ होत आहे. ‘ओमायक्रॉन’ बाधितांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 13,154 नवे करोनारुग्ण आढळले आहेत. ही वाढ बुधवारच्या तुलनेत 43 टक्क्यांनी जास्त आहे. 268 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत देशात 263 ‘ओमायक्रॉन’ बाधित नोंदवले गेले आहेत. देशातील ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या आता 961 झाली आहे.

‘ओमायक्रॉन’ संसर्ग ही नैसर्गिक लस?

करोनाच्या ओमायक्रॉन अवताराबाबत दक्षिण आफ्रिकेमधील वैज्ञानिकांनी केलेले संशोधन वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत दिलासा देणारे ठरण्याची शक्यता आहे. या संशोधनात ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन त्यातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा डेल्टा किंवा इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो, असे म्हटले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेले रुग्ण इतर संसर्गाला तोंड देण्यास सक्षम असतात, असे या संशोधनात म्हटले आहे.

...तर महाराष्ट्रात टाळेबंदी : गृहमंत्री

राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. मात्र नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे असलेले निर्बंध अजून कठोर केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. वेळ पडली तर राज्यात टाळेबंदी लागू केली जाऊ शकते, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.