युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

भरतीकरता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) आयोजित केल्या जाणार्‍या विविध भरती प्रक्रियांचे (Recruitment Procedures) अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपध्दतीवर विचार करून निवडप्रक्रियेच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यात केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (Central Public Service Commission) (UPSC) धर्तीवर एमपीएससीकडून (MPSC) सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार मुलाखती झाल्यावर शिफारसपात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र आता पदांचा पसंतीक्रम गुणवत्ता यादीनंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

पदे अडवली जाण्याच्या प्रकारांना आळा

बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रिया वगळता अन्य भरती प्रक्रियांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस केली जाईल.

लेखी परीक्षा (Written test), मुलाखतीतील गुण याबाबत माहिती नसल्याने उमेदवाराकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ सेवेत असलेल्या उमेदवाराची त्याच पदासाठी किंवा त्याच संवर्गातील पदासाठी निवड होते. मात्र आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदे अडवली जाण्याचे प्रकार थांबतील.

शासन सेवेत सुयोग्य आणि पात्रताधारक व्यक्तींची निकोप पद्धतीने निवड करण्यासाठी संविधानाच्या कलम ३१५ (Article 315 of the Constitution) अन्वये लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानाने सोपवलेली कार्य पारदर्शक पद्धतीने आणि कोणाच्याही दबावाखाली न येता आयोगाच्या स्वतःच्या कार्यपद्धतीनुसार पार पाडता येण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. तसेच शासन यंत्रणेपासून अलिप्त असा दर्जा बहाल करण्यात आला आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार २०२० व त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियांपासून अगोदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल

Related Stories

No stories found.