Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशनाशिकसह देशातील ६७ लष्कराचा रुग्णालयात सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार

नाशिकसह देशातील ६७ लष्कराचा रुग्णालयात सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार

नवी दिल्ली

देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन, बेड व व्हेटीलेटर मिळत नाही. स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

देशातील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये फक्त जवानांवर उपचार होतात. परंतु आता देशातील ६७ हॉस्पिटलमध्ये लष्कर व सामान्य रुग्णांवरही कोरोनाचे उपचार होणार आहे. यासाठी या रुग्णालयात विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. नाशिकसह देशातील ६७ शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने कोविड आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आर्मीकडून मदतीचा हात मिळणार आहे. याबाबत राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरीला आदेश दिले आहेत. DRDO आणी HAL यांच्या कॅम्पसमध्ये ही कोविड हॉस्पिटल्स उभारणीचे काम जलदगतीने सुरू झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या