Friday, April 26, 2024
HomeUncategorized९ बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशीऐवजी जन्मठेप

९ बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशीऐवजी जन्मठेप

मुंबई :

१३ लहान मुलांचे अपहरण (kidnapped)करून त्यापैकी ९ बालकांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित (Gavit sisters)या बहिणींची फाशीची शिक्षा (death penalty)रद्द करत त्यांना मरेपर्यंत जन्मठेप (Life imprisonment )देण्यात आली. उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी या दोघ बहिणींना फाशीची शिक्षा झाली होती.

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनी मोदींना धोका, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट

२० वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबाजावणी न झाल्याने आरोपींची आता जगण्याची इच्छा आणि अपेक्षा वाढली असल्याचे सांगत फाशी रद्द करण्याची मागणी कऱणारी याचिका रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेली या दोघींची आई अंजनाबाई गावित हिचा शिक्षा भोगत असतानाच कारागृहामध्येच मृत्यू झाला होता.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

राष्ट्रपतींनी फेटाळली होती दया याचिका

गावित बहिणींची दया याचिका राष्ट्रपतींनी साल २०१४ सालीच फेटाळली होती. जवळपास आठ वर्षांपासून या दोन्ही बहिणींच्या दयेचा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पडून होता. त्यानंतर या दोघी बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका केली आहे.

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

काय आहे प्रकरण

महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितसोबत विविध ठिकाणाहून 13 बालकांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची हत्या केली. साल २००१ मध्येत्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही साल २००६ मध्ये त्यांची फाशी कायम ठेवली. आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी भीक मागण्यासाठी या मुलांचे अपहरण केले. ज्या मुलांनी पैसे कमावणे बंद केले त्यांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्याने रेणुका शिंदेंचा नवरा त्यांच्यातून फुटला आणि पोलिसांना माहिती दिली. त्याला पोलिसांनी माफीचा साक्षीदार बनवले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानच अंजनाबाईचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात फाशी कायम

2004 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला दोघी बहिणींनी 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. या निर्णयानंतर पुन्हा आपला न्यायालयीन अधिकार वापरत दोघी बहिंनींनी पुन्हा आपल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले. यावेळेस मात्र 22 ऑक्टोबर 1996 पासून आपण दोघीही जेलमध्ये आहोत, असं सांगत त्यांनी 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. अंमलबजावणीत झालेल्या विलंबाच्या कारणास्तव फाशीचे जन्मठेपेत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी गावित बहिणींनी अ‍ॅड्. अनिकेत वगळ यांच्यामार्फत याचिका केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या