गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

दिल्ली l Delhi

माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली (Delhi) लोकसभा मतदारसंघाचे भाजप (BJP) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे.

गौतम गंभीरला ई-मेलवर धमकीचं पत्र मिळालं (Gautam Gambhir receives death threat from ISIS Kashmir). या प्रकरणात गंभीरनं दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

गंभीरने यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर गौतम गंभीर आणि कुटुंबाच्या सुरक्षेत मोठी वाढ कऱण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून मेलची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com