
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आयपीएल २०२३ (IPL 2023) चा ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (LSG VS RCB) यांच्यात झाला. इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरुने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला. परंतु, यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सच्या उल हक, मेंटर गौतम गंभीर व आरसीबीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात तुफान बाचाबाची झाली...
दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक रागात विराटवर धावून आला. यानंतर आपल्या संघातील खेळाडूसाठी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) देखील या वादात उडी घेतली. त्यामुळे मैदानावर विराट कोहली आणि लखनऊचा मेंटर गंभीरमध्ये भांडण झाले. या सामन्यानंतर मैदानात झालेल्या बाचाबाचीवरून सोशल मीडियावर विराट आणि गंभीरला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
अशातच पत्रकार रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी विराट आणि गौतम गंभीरच्या बाचाबाचीवर बोलतांना गंभीरला "अहंकारी आणि गर्विष्ठ" असल्याचे म्हणत गंभीरचे वर्तन माजी खेळाडू किंवा खासदार (MP) म्हणून योग्य नाही" असे म्हटले. त्यावर आता गौतम गंभीरने ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
रजत शर्मा यांच्या या विधानावर बोलतांना गौतम गंभीरने ट्विट करत म्हटले की, दबावाच्या नावाखाली DDCA अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे, क्रिकेटची (Cricket) चिंता म्हणून पैसे घेऊन पीआर करण्यास उत्सुक दिसत आहे, हे कलियुग आहे जिथे पळकुटे 'अपनी अदालत' चालवत आहेत, असे गंभीर म्हणाला आहे. त्यामुळे सध्या गंभीरचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.