गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

हा टप्पा गाठणारे अदानी हे आशियातील पहिले व्यक्ती आहेत
गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकवरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर लिस्टनुसार ते दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

गौतम अदानी हे फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत शुक्रवारी ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून त्यानंतर त्यांची संपत्ती आता सुमारे १५५.७ अब्ज डॉलर्स एवढी आहे.

फोर्ब्सच्या यादीत सध्या स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इलॉन मस्क हे अग्रस्थानी आहेत. ज्यांची एकूण संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर्स आहे. त्याच्यापाठोपाठ अदानी, अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१४९.७ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान अदानी व्यतिरिक्त रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे श्रीमंताच्या टॉप-१० यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे ७.३५ लाख कोटी (९२.१ अब्ज डॉलर्स) संपत्तीसह जगातील ८ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com