Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशगौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई | Mumbai

रिलायन्स समुहाचे मुख्य मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे सारत आता अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत आपल्या नावे एक नवा विक्रम केला आहे.

- Advertisement -

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नव्हे तर, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १३७ बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. यशस्वी उद्योजकांच्या यादीत आता केवळ एलन मस्क (Elon Musk) आणि जेफ बोझेस (Jeff Bezos) हे दोघेच अदानी यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहेत.

टेस्ला कंपनीचे (Tesla, Inc) प्रमुख एलन मस्क यांची एकूण संपत्ती २५१ बिलियन डॉलर आहे तर अमेझॉनचे (Amazon) संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती १५३ बिलियन डॉलर आहे. त्यामुळे भविष्यात अदानी यांची संपत्ती आणखी वाढली तर अदानी हे सुद्धा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर दिसू शकतात.

दरम्यान फेब्रुवारीमध्ये सर्वात श्रीमंत आशियाई म्हणून मुकेश अंबानींना मागे टाकले, एप्रिलमध्ये अब्जाधीश झाले आणि गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.

- Advertisment -

ताज्या बातम्या