सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरेनजीक गॅस टँकर उलटला
मुख्य बातम्या

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरेनजीक गॅस टँकर उलटला

एक किमी परिसर सील; सिन्नर कोपरगाव येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | वार्ताहर

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरेनजीक गॅस टँकर उलटल्याची घटना घडली. टँकरमधून गॅसगळती होत असल्यामुळे आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

घटनास्थळी सिन्नर एच पी प्लांट येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून वायुगळती रोखण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

अपघातस्थळी समोरच पेट्रोल पंप असल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक ते दीड किमी परिसर निर्मनुष्य केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Deshdoot
www.deshdoot.com