'गर्जा महाराष्ट्र'ला राज्य गीताचा दर्जा

- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
'गर्जा महाराष्ट्र'ला राज्य गीताचा दर्जा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...' या गीताला ('Jai Jai Maharashtra maja, Garja Maharashtra maja...' Song )महाराष्ट्राचे राज्य गीत असा दर्जा दिला जाणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Culture Minister Sudhir Mungantiwar)यांनी मंगळवारी याबाबत घोषणा करताना ‘गर्जा महाराष्ट्र’ गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या गाण्यातील दोन कडवी घेतली जाणार आहेत. एक मिनिट किंवा दीड मिनिटांचे हे गीत करून ते राज्यगीत म्हणून घोषीत केले जाणार आहे. महाराष्ट्र पुरस्कार कार्यक्रम आणि राज्य गीत याची घोषणा दिवाळी नंतर एक कार्यक्रमात केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व शासकीय कार्यक्रमात हे गीत लावले जाणार आहे. हे गीत संपूर्ण महाराष्ट्राला नवीन उत्साह देणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र गौरव गीत अशी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताची ओळख आहे. सीमा आंदोलनाच्या काळात हे गाणं चांगलच लोकप्रिय झाले होते. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजाने अजरामर केले.

या राज्यगीताचा राजशिष्टाचार असणार आहे. म्हणजे सर्व शासकीय कार्यक्रमात हे गीत वाजविण्यात येईल. कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने होणार आहे.

या गिताचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांची परवानगी घेण्याचे सर्व सोपस्कार पार पाडूनच हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. १९ ऑक्टोबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र हवामान खात्याने मोठया पावसाचा इशारा दिल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. अन्यथा याच कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली असती असेही मुनगंटीवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com