रस्त्यावर कचरा; कारवाई होणार का?

रस्त्यावर कचरा; कारवाई होणार का?

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटी ( Panchavati ) परिसरातील दिंडोरीरोड, पेठरोड व विविध विस्तारीत नगरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा रहिवासी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पंचवटीकरांनी कचरामुक्त पंचवटी कधी होणार, असा सवाल उपस्थित केला आहे.

पंचवटीतील विविध विस्तारीत नगरांच्या नवीन व जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा रहिवासी नागरिकांनी आपल्या घरातील कचरा(garbage) टाकून कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याने रोगराई पसरण्याची भीतीदेखील व्यक्त केली आहे.

नाशिक शहरातील पंचवटी भागात पेठरोड, दिंडोरीरोड, तारवालानगर ते अमृतधाम, तारवालानगर ते राजमाता रासबिहारी रोड, हिरावाडी परिसर आदी ठिकाणी निरीक्षण करता रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा दिसून येत आहे. सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक फक्त कागदावर व वाचण्याइतपत राहिले आहे.घंटागाडी वेळेवर येत नसल्याने व कचरा टाकणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.

नाशिककरांनी मात्र सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक असे स्वप्न पाहिले आहे. नाशिककरांचे पंचवटीकरांचे सुंदर व स्वच्छ नाशिक दुर्गंधीमुक्त कसे होईल, असा सवालदेखील केला आहे.ठराविकच ठिकाणी स्वच्छता केली जाते व काही ठिकाणी मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. नाशिक शहरात येणार्‍या पर्यटकांना कचर्‍याचे दर्शन होत असल्याने स्मार्ट नाशिक कसे होणार असेदेखील वाटू लागले आहे. कचरामुक्त नाशिक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com