इलेक्ट्रीकच्या सामानाखाली दडपल पण पोलिसांनी हुडकून काढल ना राव

इलेक्ट्रीकच्या सामानाखाली दडपल पण पोलिसांनी हुडकून काढल ना राव

भुसावळ bhusaval। प्रतिनिधी

भुसावळकडून जळगावकडे जाणारा आयशर ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB) फिल्मी स्टाईल अडविला. या ट्रकमध्ये इलेक्ट्रीकचे सामानाखाली (Electrical accessories) प्लास्टीक पिशव्यामध्ये लपवून ठेवलेला गांजा (Ganja) आढळुन आला आहे. या गांजाचा बाजारभाव सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या गांज्याचा मालक नेमका कोण आहे? तो कुठे जात होता? याचा तपास पोलिस करीत आहेत.

इलेक्ट्रीकच्या सामानाखाली दडपल पण पोलिसांनी हुडकून काढल ना राव
Yuvarang Youth Festival # महाराष्टाची हास्य जत्रा फेम ओकांर भोजनेंने फैजपूरात दिला तरूणाईला हा सल्ला...

माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गांजा घेवून निघालेला एमएच 15-6994 क्रमांकाचा आशयर ट्रक ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथून गांजा घेवून निघाला होता. या ट्रकमधील इलेक्ट्रीक सामानाखाली 16 प्लॉस्टीच्या पिशव्यांमध्ये 500 किलो 600 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा नाशिक, मालेगाव परिसरात वितरीत करण्यात येणार होता.

पोलिसांनी या कारवाई 75 लाखांच्या गांज्यासह इलेक्ट्रीक साहित्य व ट्रक मिळून सुमारे एक कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान सदर ट्रक भुसावळहून जवळगावकडे जात असतांना नवोदय विद्यालया पुढील जॉली पेट्रोल पंपाजवळ हा ट्रक चालकाने लावून तो पसार झाला होता. या ट्रकवर पोलिस पथकाने तीन तास पाळत ठेवली. मात्र कोणीही आढळून आले नाही.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक नजन पाटील, पीएसआय गणेश चौबे, पीएसआय देवरे, हेकाँ अशोक दामोदरे, श्रीकृष्ण देशमुख, कमलाकर बागुल, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान एलसीबीच्या एका पथकाने मालगाव येथे जावून चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक नजन पाटील व त्यांचे सहकारी करित आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com