गँगस्टर रवी पुजारीला पोलीस कोठडी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

गँगस्टर रवी पुजारीला पोलीस कोठडी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी

खंडणी आणि हत्येचा प्रयत्न याप्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मुंबईतील गँगस्टर रवी पुजारी ताब्यात आहे. आज नाशिकच्या न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली. या सुनावणीत रवी पुजारीला येत्या २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनाण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सोपान निघोट यांनी मोहनानी खंडणी प्रकरणी रवी पुजारीला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासमोर हजर केले होते.

मोहनानी यांना रवी पुजारी परदेशातून कॉल करून खंडणी मागत होता. हे कॉल रेकार्ड असून, आवाजाचे नमुने तपासणे, हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे ली तरी कोठून?

हल्ल्याच्या योजनेसाठी पैसे कसे उभे राहिले? अशा विविध दहा ते बारा कारणांसाठी संशयितास पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी केली होती.

ही मागणी मान्य करीत न्यायालयाने पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com