पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; शहरावरील पाणी कपातीचे संकट दूर

गंगापूर धरण
गंगापूर धरण

नाशिक | Nashik

नाशिक शहराला पाणीपुरवठा (Nashik city water supply) करणाऱ्या मुख्य धरण असलेल्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात (Gangapur Dam water catchment area) मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या गंगापूर धरण 66% भरले असून नाशिक शहरावर जी पाणी कपातीचे संकट होते ते दूर झाले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचे वापर जपून करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...

2 जुलै दरम्यान गंगापूर धरणासह (Gangapur Dam) मुकणे धरणाच्या (Mukane Dam) पाणी साठ्याच्या अवलोकन केल्यावर 31 जुलै पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा महापालिकेचा राखीव होता. यावेळी वरूणराजानेदेखील नाशिकवर कृपादृष्टी केलेली नव्हती. त्यामुळे नाशिकमधील पाणीकपातीचे संकट गडद झाले होते.

यामुळे या आठवड्यात पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, मागच्या गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सध्या गंगापूर धरणात 66 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. (Heavy rainfall in nashik)

यामुळे सध्या तरी पाणी कपातीचा संकट नाही, तसेच नाशिक शहराला (nashik city) वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नाशिक शहराला प्रति दिवसाला 19 दशलक्ष घनफूट पाणी लागतो.

त्यानुसार नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने गंगापूर धरणासह (Gangapur & Mukane Dam) मुकणे धरणात पाणी आरक्षित करण्यात येते. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या 2 जुलै पर्यंत आरक्षित साठ्यापैकी मुकणे धरणात 200 दशलक्ष घनफूट पाणी आहे.

त्याचप्रमाणे, गंगापूर धरणात 415 दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेच्या हक्काचा साठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत गंगापूर धरणात त्या तारखे पर्यंत तीन टक्के कमी पाणीसाठा होता. यामुळे चिंता वाढली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com