गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्क्यांची वाढ; पालखेडमधून होणार विसर्ग

गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्क्यांची वाढ; पालखेडमधून होणार विसर्ग
गंगापूर धरण (File Photo)

नाशिक | Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur dam water shed) पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गंगापूर धरणाच्या (Gangapur dam) पाण्याच्या पातळीत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाची संततधार सुरु राहिल्यास रात्रीत केव्हातरी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पालखेड धरणातून सायंकाळी ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे...

नाशिक जिल्ह्यात (Nashik district) गेल्या तीन दिवसांपासून पाऊस (Rain) सुरु झाल्याने ५४ टक्क्यांवर स्थिरावलेला पाऊस आता ५७ टक्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. गत वर्षी याच दिवसात पावसाने ७३ टक्के सरासरी ओलांडली होती. येत्या पंधरा दिवसा पावसाची कृपा राहिली तर ती सरासरीही ओलांंडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गंगापूर धरण समुहातील जलसाठा एकाच दिवसांत ७० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी धरणातुन विसर्ग (Water Discharged) सुरू आहे. आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवाामान खात्याने (Weather Department) व्यक्त केल्यामुळे पावसाने जोर धरला तर धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळपासून दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. पहाटे पाऊस झाला. अधूनमधून हलक्या सरीं पडल्या. दिवसभर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक सरी कोसळल्या.

नांदुरमध्यमेश्वरमधून ६००, भावली धरणातून ७३, वालदेवीतून ६५, हरणबारीतून ६० क्युसेस पाणी सोडले आहे. वालदेवी, भावली १०० टक्के, नांदुरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwer) ९६ टक्के भरले आहे. गिरणामध्ये ४० टक्के जलसाठा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com