जायकवाडीला दिलासा; गंगापूर धरणसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

जायकवाडीला दिलासा; गंगापूर धरणसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ
गंगापूर धरण (File Photo)

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणी पातळीत रात्रीतून तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरण (Gangapur Dam) ८५ टक्के भरले आहे. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अद्याप पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे जायकवाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

गंगापूर धरण समूहातील (Gangapur Dam water shed) पाणीसाठयात मोठी वाढ झाली असून ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये गौतमी गोदावरी (Gautami Godavari) ६९ टक्के, कश्यपी (Kashyapi) ५८ तर आळंदी धरण (Alandi Dam) ९८ टक्के भरले आहे. पालखेड धरणसमूहातील (Palkhed Water Shed) धरणांत ४६ टक्के पाणीसाठा आहे.

दुसरीकडे पालखेड धरण समूहात तीनही धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पालखेड धरणात (Palkhed Dam) ७५ टक्के, करंजवन (Karanjwan) धरणात ३५ तर वाघाड धरणात (Waghad Dam) ६५ टक्के जलसाठा आहे.

गिरणा धरणसमूहातील (Girna Dam Water Shed) हरणबारी धरण (Harnbari Dam) १०० टक्के भरले असून १६४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग मोसम नदीत (Mosam River) होत आहे. तर चणकापूर (Chankapur Dam) ४३ टक्के आणि केळझर धरण (Kelzar Dam) ७४ टक्के भरले असून याठिकाणी पावसाची संततधार सुरु राहिली तर आराम नदीत (Aram River) पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. गिरणा धरणात (Girna Dam) ४२ टक्के जलसाठा आहे तर नागसाक्यात मात्र अद्याप एक टक्केही जलसाठा नाही.

दुसरीकडे दारणा (Darna Dam), भावली (Bhavli Dam), वालदेवी (Waldevi) आणि नांदूरमध्यमेश्वरमधून (Nandurmadhyameshwar) पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यात नांदूरमध्यमेश्वरमधून १ हजार पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. वालदेवीतून ६५ तर दारणातून १५० आणि भावली धरणातून १३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com