गंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार; गोदाकाठी सावधानता बाळगा

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार; गोदाकाठी सावधानता बाळगा
गंगापूर धरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरण समूहात (Gangapur Water Shed) रात्रभर संततधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणाची पाणीपातळी (Dam Water Level) वाढली आहे. त्यामुळे जवळपास ९०० ते १ हजार क्युसेक पाण्याच्या अतिरिक्त विसर्ग गंगापूर धरणातून गोदावरीत (Godavari River) सकाळी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातून एकूण विसर्ग २ हजर ५०० क्युसेक करण्यात येणार आहे.... (Water discharged from gangapur dam)

याबाबतची माहिती आज सकाळी जलसंपदा विभागाकडून (Irrigation & Water resource dept) देण्यात आली. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिकसह परिसरात संततधार पावसाने ठाण मांडले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. सर्वच धरणे १०० टक्क्यांकडे वाटचाल करत आहेत. तर धरणांची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नियमानुसार पाणी धरणातून सोडण्यास सुरुवात झाली आहे.

सद्यस्थितीत दारणा (Darna Dam) धरणातून १० हजार ६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कडवा (Kadawa Dam) मधून २ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आळंदी धरणातून (Alandi Dam) ३० तर वालदेवीतून (Waldevi Dam) १८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सद्यस्थितीत १ हजार ५२० क्युसेक विसर्ग सुरु असून सकाळी ९ वाजेनंतर हा विसर्ग २ हजार ५०० क्युसेक करण्यात येणार आहे. दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhyameshwar Dam) १६ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून पाणी जायकवाडीकडे झेपावू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com