पावसाची संततधार; गंगापूर धरणातून विसर्गाला सुरुवात

पावसाची संततधार; गंगापूर धरणातून विसर्गाला सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur dam catchment area) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. (Rain in Nashik district) त्यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे....

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतर पुढील तीन तासांनी म्हणजेच दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा विसर्ग एक हजार क्युसेक ने वाढवून तीन हजार क्युसेक करण्यात येणार आहे.

रात्रभर धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Taluka) तालुक्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरु आहे. धरण ९९ टक्क्यापेक्षा अधिक भरले असल्यामुळे पाणीपातळी वाढण्यास सुरुवात होताच धरणातून विसर्ग केला जात आहे.

आज सकाळी नऊच्या सुमारास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. (Water discharge from gangapur dam)

धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे गंगाघाटावर पाणी वाढले आहे. दुपारी दोन वाजेनंतर पाणी अधिक वाढणार आहे. (Ramkund Godaghat Nashik) पाण्याची पातळी वाढणार असल्यामुळे नदीकाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत दारणा (Darna) धरणातून ५५० क्युसेक, गंगापूरमधून (Gangapur) २०५८ क्युसेक, वालदेवीतून (Valdevi) १८३ क्युसेक, कश्यपीतून (Kashyapi) १५० क्युसेक विसर्ग होत आहे. तर नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) बंधाऱ्यातून आताच्या घडीला २ हजार ४२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत आहे.

गंगापूर धरणातून आज 12 वाजता एकूण 3000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे.

सागर शिंदे, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com